*स्मार्टफोन हँग होतोय?*
➖➖➖➖➖➖➖➖📱📱📱📱📱📱📱📱
➖➖➖➖➖➖➖➖
‘स्मार्टफोन घेतला तेंव्हा तो अगदी नीट चालत होता, पण आता तो हँग होतोय, संथ गतीने चालतोय’; ही काही फार वेगळी आणि विशेष अशी समस्या नाही. प्रत्येक स्मार्टफोनची एक क्षमता असते आणि त्या क्षमतेबाहेर जर आपण त्यावर काम सोपवलं, तर सहाजिकच तो हँग होतो. आपल्याला ताण आल्यानंतर आपलं डोकं जसं हँग होतं, अगदी त्याचप्रमाणे स्मार्टफोनवर ताण आल्यानंतर तो हँग होऊ लागतो. त्याच्यावर कसला ताण आला आहे? हे जर आपण समजून घेतलं, तर आपण त्यावरील ताण मोकळा करु शकतो, जेणेकरुन त्यास पूर्ववत कार्यक्षमतेने काम करणे शक्य होते. यादृष्टीने जर आपल्याला दोन सोप्या गोष्टी व्यवस्थित समजल्या, तर आपला फोन काही मिनिटांतच पुन्हा व्यवस्थित होणे शक्य आहे.
‘इन्टरनल मेमरी’ आणि ‘रॅम’ (RAM) हे दोन महत्त्वाचे शब्द लक्षात ठेवा. आपल्या मेंदूमध्ये जसं निरनिराळ्या विषयांचं ज्ञान साठवलेलं असतं, अगदी तसंच इन्टरनल मेमरी मध्ये विविध प्रकारचा डेटा साठवलेला असतो. पण हे सर्व प्रकारचे ज्ञान आपण एकाच वेळी वापरतो का? तर नाही! ज्यावेळी जितक्या ज्ञानाची गरज आहे, आपण त्यावेळी केवळ तितकंच ज्ञान वापरतो. त्याचप्रमाणे ‘इन्टरनल मेमरी’ मधील सर्व प्रकारचा डेटा हा काही एकाच वेळी उपयोगात येत नाही. ज्यावेळी जितका डेटा गरजेचा आहे, त्यावेळी तितकाच डेटा वापरला जातो.
आपला स्मार्टफोन एकावेळी किती काम करु शकेल? यासही मर्यादा असते. ‘इन्टरनल मेमरी’ मध्ये जरी भरपूर डेटा ग्रहण करण्याची क्षमता असली, तरी आपला स्मार्टफोन एकावेळी किती काम करु शकेल? ते आपल्या फोनच्या RAM वर अवलंबून असते. थोडक्यात काय? तर आपल्या फोनची ‘इन्टरनल मेमरी’ आणि ‘रॅम’ हे योग्य प्रमाणात रिकामे असणे आवश्यक आहेत. ‘इन्टरनल मेमरी’ अथवा ‘रॅम’ जर भरलेली असेल, तर अर्थातच आपल्या स्मार्टफोनवर ताण आहे असे समजण्यास हरकत नाही.
आपल्या स्मार्टफोनच्या Settings मध्ये जा. Apps मध्ये या. काही अॅप्स हे External Memory वर हलवता येत असले, तरी ते मुळतः Phone storage / Internal storage म्हणजेच Internal Memory मध्ये साठवलेले असतात. Downloaded या विभागात आपणास आपल्या फोनवरील अॅप्सची यादी दिसेल. स्क्रिनच्या तळाशी आपल्या स्मार्टफोनमधील Phone storage / Internal storage ची स्थिती दिसेल. आपल्या स्मार्टफोनच्या एकंदरीत Internal storage पैकी कमीतकमी १५% मेमरी रिकामी आहे का? ते तपासून पहा. नसल्यास, काही अॅप्स अन्इन्स्टॉल करा, काढून टाका. किंवा फाईल मॅनेजरमध्ये जाऊन फोनच्या इन्टरनल मेमरीमध्ये जर ऑडिओ, व्हिडिओ, इमेज फाईल्स असतील, तर त्या मेमरी कार्डवर हलवा, जेणेकरुन आपल्या Internal storage वरील ताण कमी होईल.
इन्टरनल मेमरी
एकंदरीत इन्टरनल मेमरीच्या कमीतकमी १५% इन्टरनल मेमरी मोकळी असावी
अशाप्रकारे इन्टरनल मेमरी रिकामी केल्यानंतर आता आपल्याला RAM रिकामी करायची आहे. आत्ता आपण Settings – Apps – Downloaded मध्ये आहात. स्क्रिन डाव्या बाजूस सरकवून (Slide करुन) Settings – Apps – Running मध्ये या. स्क्रिनच्या तळाशी आपणास RAM ची स्थिती दिसेल. आपल्या फोनच्या एकंदरीत RAM पैकी कमीतकमी २५% RAM रिकामी आहे का ते पहा? नसल्यास, Running या विभागात दिसणार्या अॅप्सपैकी आपल्याला न लागणारे अॅप Downloaded मधून अन्इन्स्टॉल करा. त्यानंतर ते Running मधूनही दिसेनासे होतील व अशाप्रकारे आपल्या RAM वरील ताण काहीप्रमाणात नाहीसा होईल.
रॅम (RAM)
एकंदरीत रॅमपैकी साधारण २५% रॅम मोकळी असावी
Clean Master व तस्सम अॅप्स हे आपल्या फोनमधील RAM व्यवस्थित हाताळून आपला फोन स्वच्छ ठेवण्याचा दावा जरी करत असले, तरी अनेकदा अशा अॅप्समुळेच आपल्या स्मार्टफोनची कार्यक्षमता खालवते. त्यामुळे आपल्या स्मार्टफोनवर जर अशाप्रकारचे एखादे अॅप असेल, तर ते काढून टाका. मला वाटतं या सर्व गोष्टी केल्यानंतर आता आपल्या स्मार्टफोनची गती वाढण्यास हरकत नाही
✍🏻 *संकलन* ✍🏻
*समीर सय्यद*
*रायगड*
खूप छान माहिती आहे ,
ReplyDelete