मोबाईल वर शूट करतांना

मोबाईल वर व्हिडीओ शूट करताना पुढील बाबींचा जरूर विचार करा..

*General Guideline for Mobile Video Shoot*

1. मोबाईल जास्तीत जास्त स्थिर धरा.
2. फ्रेम मध्ये नेमके काय येत आहे याचा पूर्ण विचार केल्यावरच व्हिडीओ शूट सुरू करा.
3. परफेक्ट शॉट मिळाल्यावर शूट लगेच बंद करा. शूट बंद करताना मोबाईल हलणार नाही याची काळजी घ्या.
4. मुव्हिंग शॉट घ्यायचा असेल तर कोठून कुठं पर्यंत हे आधीच ठरवा
5. मधेच पुढे मधेच मागे मधेच वर मधेच खाली हे टाळा. पॅन करताना कॅमेरा एकाच दिशेने करा.
6. प्रत्येक शॉट घेण्यापूर्वी आधी दोनदा ते तीनदा त्याचा सराव करा नंतरच तो शॉट घ्या.
7. शॉट घेताना अजिबात गडबड करू नका.
8. प्रत्येक शॉट साठी किमान  2-3 टेक घ्या म्हणजे त्यातील परफेक्ट निवडता येईल..
9. शूट मध्ये जे प्रामुख्याने दाखवायचे असेल फोकस असणे आवश्यक असते.
10. आउट डोअर शूट मध्ये समोरून प्रकाश येत असेल तर शूट ची वेळ बदला
11. व्हिडीओ शूट करताना आवाज महत्वाचा असेल तर एक्सटर्नल माईक कंपल्सरी वापरा.(त्या संबधी सेटिंग Cinema FV5 मध्ये आधीच करा)
12. स्थिर शूट साठी स्टँड, आणि स्मूथ-जर्क फ्री शॉट साठी शक्य असेल तर जिम्बल वापरा.
12.  स्टेडी, स्मूथ, जर्क फ्री, सावकाश(एडिटिंग मध्ये स्पीड वाढवता येतो), समांतरता, लाईट, फोकस, फ्रेम, अँगल या प्रत्येकाचा विचार शूट करताना नेहमी करावा.. 
*शूट करताना या गोष्टी पाळल्या तर कोणीच ओळखू शकत नाही की तुम्ही मोबाईल वर शूट केले आहे ते.*
------
भूषण कुलकर्णी 8055819181
एकनाथ कोरे 9822057786

No comments:

Post a Comment